सांगली, २८ जून २०२० :
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील जांभूळणी गावातील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहचवण्यासाठी एकदम कल्पक मार्ग शोधला. ग्राहकांकडून आधीच ऑर्डर्स घेऊन तशा शेतमालाचे बास्केट तयार केले आणि सांगली शहरात सोसायट्यांमध्ये जाऊन घरपोच केले.
पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं सेटअप तयार करायला शेतकऱ्यांना मदत केली. लॉकडाऊन जसे वाढले तसे शेतकरी परिघ वाढवत वाढवत पुणे, चिंचवड, नवी मुंबई, मुंबई इथपर्यंतच्या ग्राहकांपर्यंत पोहोचले. केवळ ८ फेऱ्यांमध्ये या शेतकऱ्यांनी ६,३७,६५० रुपयांचा शेतमाल विकला.
जांभूळणी गावातल्या काही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी २०२० पासून मस्त्यशेतीचा प्रयोगही सुरू केला आहे. गोड्या पाण्यातल्या माशांची पैदास करून एक खास मासळी मार्केट तयार करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. सध्या शेजारीला गावांमध्ये त्यांना काही ग्राहक मिळाले आहेत ज्यामुळे आजवर ते ६०० किलो मासळी विकू शकले आहेत.
जांभूळणी गाव हे वेगवेगळे प्रयोग करणारे गाव म्हणून ओळखले जाते. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी