मुंबई, पुण्यात अजून महिनाभर लॉकडाऊन?

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन आज महिना पूर्ण झाला. मात्र राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशातला लॉक डाऊन काही दिवसांनी संपत असला तरी राज्यामधील कॅन्टोन्मेंट भागातील लॉकडाऊन पुढील महिन्यापर्यंत तरी लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता सरकारकडून वर्तवली जात आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

याबाबत राज्यातील महत्वाच्या ठिकणी मुंबई, पुणे परिसरात लॉकडाऊन उठवायचा विचार सध्या तरी करण्यात येणार नाही. मुंबई उपनगरं आणि परिसर तसंच पुणे आणि परिसरात किमान जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कारण या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि दुकानं सुरू करण्याचं अधिक धोक्याचं ठरू शकतं.

मुंबई आणि पुण्यात सातत्याने वाढणाऱ्या कोरोनारुग्णांमुळे महाराष्ट्र राज्य सरकार चिंतेत आहे. ही शहरे बंद असताना आर्थिक घडी नीट करण्यासाठी नवा आराखडा आखायचा राज्य सरकार विचार करत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

अंदाजे २०० नव्याने रुग्ण मिळत असल्याने मुंबईत कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एकट्या मुंबईतच साडेचार हजारांवर गेली आहे. तसेच पुणे महानगर परिसरातही हाच धोका आहे. पुणे, पिंपरी चिंचवड भागात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईमधील जसा झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे, तसाच पुण्याच्या अरुंद गल्ल्यांच्या दाट लोकवस्तीच्या पेठांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे मुंबई, पुण्यातील लॉकडाऊन उठणे सध्या तरी अशक्य असल्याचे मत सरकारी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा