राज्यात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू

मुंबई, २९ जून २०२०:  कोविड -१९ चे सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र आहे. कोविड -१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्य आता वाढत चालला आहे आणि आता तो विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचला आहे. गेले तीन महिने सातत्याने लॉक डाऊन असल्याने राज्य सरकारने नियमांमध्ये शिथिलता देत मिशन ‘बिगीन अगेन’ मोहीम चालू केली. थोडक्‍यात मिशन बिगीन अगेन चा हा पहिला टप्पा म्हटले तरी चालेल. तथापि ३० जून रोजी लॉकडाउन संपत आहे. दरम्यान आज ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

काय आहे ‘मिशन बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा?

३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन ६.०.

मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत.

त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ जुलै रात्री १२ पर्यंत लॉकडाऊन कायम असेल.

अत्यावश्यक दुकानं आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम.

सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम.

राज्यात ३१ जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद.

बिगीन अगेननुसार दिलेल्याच सवलतींना मुदतवाढ.

रविवारी, महाराष्ट्रात एकदिवसीय सर्वात मोठी वाढ ५,४९३ कोविड -१९ प्रकरणे नोंदली केली ज्यात राज्यात रूग्णांची संख्या १,६४,६२६ इतकी आहे. राज्यात मृतांचा आकडा ७,४२९ वर गेला आहे.

बीपी आज लॉक डाऊन घोषित होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी लाईव्ह व्हिडिओ द्वारे संपर्क साधून पुढील निर्णय काय असेल याबाबत स्पष्टता दिली होती. काल मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट केले होते की, “३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत.”

पुढे ते म्हणाले होते की, “गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या लाल क्षेत्रातील (रेड झोन) निर्बंध अधिक कडक करण्यात येतील,टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा