नवी दिल्ली: फ्रोजन फूड निर्यात वाढविण्यावर सरकार भर देत आहे. कोरोना विषाणूमुळे ग्राहक चिनी उत्पादनांपासून स्वत: ला दूर ठेवत आहे कारण चीन मधूनच हा व्हायरस सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात फ्रोजन फूड उत्पादनांची मागणी वाढली आहे.
ब्लूमबर्गला पाठवलेल्या ई-मेल मुलाखतीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या की, मुख्यतः पूर्व आशियाई देशांमध्ये भारतासाठी मोठी संधी आहे. या देशांमध्ये फ्रोजन फूडची मागणी खूप जास्त आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी सरकार देशातील फ्रोजन फूड कंपन्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.
जागतिक अन्न उत्पादनाच्या बाबतीत भारत दुसर्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण अन्न उत्पादनापैकी केवळ १० टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. कारण देशात कोल्ड स्टोरेजची तीव्र कमतरता आहे. सरकारचे हे प्रयत्न परकीय चलन वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करणारे ठरू शकतात.
ते म्हणाले, “जगभर चीन विरुद्ध द्वेष निर्माण झाला आहे. त्यामुळे चिनी उत्पादनांना जगभरातून कमी मागणी येत आहेत. जगभरात आलेला हा बदल पाहता प्रक्रिया केलेल्या आणि मूल्यवर्धित उत्पादनांसाठी मला ही एक मोठी संधी दिसत आहे. आपण फ्रोजन फूड आणि रेडी टू इट सेगमेंट्स यासारखे प्रमुख क्षेत्र काबीज केले पाहिजे. “देशात ऑर्गेनिक अन्नासाठीही पर्याप्त स्त्रोत आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार अन्न प्रक्रिया उद्योगाचा भारताच्या कृषी निर्यातीत २५% वाटा आहे आणि दर वर्षी सुमारे ८% दराने वाढ होत आहे. २०१८-१९ एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रक्रिया केलेल्या खाद्य आणि इतर उत्पादनांची एकूण निर्यात अंदाजे १२०० दशलक्ष डॉलर्स होती. ते म्हणाले की, अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिक मदत करण्यासाठी सरकार कोल्ड स्टोरेज चेन, रहदारी आणि मेगा फूड पार्कची क्षमता वाढवित आहे. २०२२ पर्यंत भारताने कृषी निर्यातीचे मूल्य ६० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी