सोलापूर: सोलापूर येथील श्री क्लासेस च्या वतीने करोना लॉक डाऊन मध्ये इयत्ता 10 वी इंग्रजी माध्यमांच्या मुलांसाठी मराठी विषयाचे दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल या पंधरा दिवसांच्या कालावधीत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रोज दुपारी 4-30 ते 5-30 या वेळेत मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमांसाठी मराठी हा विषय आवघड असतो त्या अनुषंगाने हे मार्गदर्शन सुरू करून मुलांना एक दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. यामुळे वेळेचा सदुपयोग कसा करता येतो हेही दाखवून दिले आहे. सोलापूर, पुणे, सांगली, नांदेड अशा बऱ्याच ठिकाणची मुले घरी बसून या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. या कालावधीत मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेण्यात येणार आहे. पुण्यातील १०वी चा विद्यार्थी आयुष बिडवे याने हा उपक्रम आवडला असल्याचे तसेच यामुळे चांगले मार्गदर्शन मिळत असल्याचे ’न्यूज अनकट’शी बोलताना सांगितले.
हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून तो 30 एप्रिल पर्यंत चालणार आहे असे श्री क्लासेसचे संचालक हेमंत निंबर्गी यांनी सांगितले.