गोल पोस्ट राष्ट्रीय तो’ पर्यत सभागृहात येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय

तो’ पर्यत सभागृहात येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय

नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२३ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे बरेचसे कामकाज गदारोळात वाहून गेले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सत्ताधारी आणि विरोधी खासदारांकडून घातल्या जात असलेल्या गोंधळावर नाराज झाले आहेत. जोवर खासदारांचे वर्तन सुधारणार नाही, तोवर लोकसभेत न येण्याचा निर्णय बिर्ला यांनी घेतला आहे.

लोकसभेत मंगळवारी दिल्ली संदर्भातले विधेयक मांडतेवेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. त्यावेळी काही विरोधी खासदारांनी वेल मध्ये येऊन बिर्ला यांच्या दिशेने कागदाचे तुकडे फेकले होते. यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत खासदारांचे वर्तन सुधारणार नाही, तोपर्यंत आपण सदनात येणार नाही, असे सांगितले होते. खासदार जर सभागृहांचे कामकाज सुरळीत चालवू देत नसतील तर आपण सभागृहात येणार नाही.

दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरुन चर्चा घेण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचे आज कामकाज पूर्णपणे वाया गेले. सकाळच्या सत्रात पीठासीन अधिकाऱ्यांना प्रश्नोत्तर तसेच शून्य प्रहाराचे कामकाज गुंडाळावे लागले तर दुपारच्या सत्रात अवघ्या काही मिनिटांत पीठासीन अधिकारी किरीट सोळंकी यांनी कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version