लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर परिक्षेत आशा घुले पहिली

संगमनेर : संगमनेर पठार भागातील सावरगाव घुलेनजीक टाळूचीवाडी येथील आशा दादाभाऊ घुले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आली आहे.
आशाचे प्राथमिक शिक्षण टाळूचीवाडीत झाले. माध्यमिक शिक्षण सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात झाले.
डीएड करतानाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर पती नितीन वाळुंज यांनी प्रोत्साहन दिले.
परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली. उपनिरीक्षक पदासाठी २०१८ मध्ये परीक्षा दिली. त्यात तिची निवड झाली. यानंतर तिने विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा दिली. ३५ जागांसाठी राज्यातून साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६० उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेतून ३५ जणांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली. त्यात आशा राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा