नाशिकच्या नांदगाव बसस्थानकातुन लांबपल्ल्याच्या बसेस बंद, मराठा आंदोलनाचा परिणाम

नाशिक, नांदगाव ३१ ऑक्टोबर २०२३ : सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या गावी, मराठा समाजाचे आमरण उपोषण सुरु आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, बिड, माजलगाव, पुणे या भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सतर्कता म्हणून नांदगाव बसस्थानकांतुन सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या बसेस बंद करण्यात आल्या.

मराठा आंदोलनाची झळ नांदगांव बस आगाराला देखील बसली आहे. नाशिक वगळता इतर जिल्हामार्गावर चालणाऱ्या नांदगांव डेपोच्या बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नांदगांव बस स्थानकातुन आता फक्त नाशिक,वगळता इतर मार्गावरील सर्व बस बंद करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.

हिंसक वळण लागल्यास बसचे नुकसान नको या हेतून हा निर्णय आगाराच्या वतीने घेण्यात आला आहे. हीच परिस्थिती राज्यातील व जिल्ह्यातील इतर बस स्थानकांची असल्याचे समजते. त्यामुळे आता सध्यातरी प्रवाशांना बाहेर प्रवास करण्यासाठी खाजगी वाहन किंवा भाडोत्री वाहनाचा वापर करावा लागेल या साठी पैसे देखील जास्त मोजावे लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा