लोणी देवकर औद्योगिक वासाहतीध्ये वाढत्या चोऱ्या उद्योजकांसाठी डोकेदुखी

इंदापूर, दि. ७ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. यामध्ये ४० हुन अधिक लहान मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत. यातील बहुतांश कंपन्या  प्रकल्पांच्या विस्तृत जागेत ठेवलेल्या मालावर डल्ला मारण्याचे काम औद्योगिक परिसरात सध्या सुरू असून, लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच तीन कंपन्यांचे लाखो रुपये किमतीचे पार्टस आणि भंगार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. करोडो रुपयांचे प्रकल्प या कंपन्या उभारत आहेत, मात्र सुरक्षितेच्या धोरणाबाबत त्यांच्याकडून उदासीनता आहे.

याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कंपन्या तयार नाहीत. औद्योगिक परिसरातील कंपन्यांना पोलिसांनी सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभी करण्याचे निर्देश अनेकवेळा वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून दिले आहेत. मात्र, व्यवस्थापनाकडून पोलिसांनी दिलेले निर्देश गांभीर्याने घेतले जात नसल्याचे परिसरात होणाऱ्या चोऱ्यांवरून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना चोरीचा तपास करताना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रत्येक कंपन्यांच्या बाहेर सीसीटीव्ही लावले तर संपूर्ण औद्योगिक वसाहत सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्यास मदत होईल. मात्र, याबाबतही कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या परिसरात अनेक  कंपन्या असल्याने येथे हजारो कामगार आणि त्यावर आधारित व्यवसाय या परिसरात आहेत. येथे असणाऱ्या कामगारांची पडताळणी झाली की नाही हा एक भाग आहे. कारण यातील बहुतांश कामगार हे परप्रांतीय आहेत. लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील भंगार, स्पेअर पार्ट चोरीपासून दुचाकींच्या चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत.

लघुउद्योगांमध्ये भुरट्या चोऱ्या होत आहेत, तर काही कंपन्यांकडून सुरक्षा रक्षक नेमले जात आहेत. औद्योगिक वसाहतीत चोऱ्या रोखायच्या असतील तर प्रत्येक कंपनीने आपल्या गेटच्या बाहेर सीसीटीव्ही लावून त्याचे कनेक्शन पोलिसांना दिले, तर चोऱ्यांना निश्चितच आळा बसेल मात्र यासाठी आता पोलिसांनीच सक्ती करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

बहुराष्ट्रीय कंपनीतील भंगार चोरी मात्र गुलदस्त्यात

मागील काही दिवसांपूर्वी येथील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भंगार चोरून नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र याबाबत कंपनी प्रशासनाकडून हा अंतर्गत प्रकार असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली तर याबाबत पोलीस ठाण्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर प्रकार गोपनीय असल्याचे करण देत गुन्हा नोंद केलेली प्रत देण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात बडे मासे असल्याचे तसेच सदर कंपनीचे व स्थानिक प्रशासनाचे लागे बांधे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नारायण सारंगकर (पोलीस निरिक्षक इंदापूर पोलीस ठाणे.) म्हणाले की, त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा