लोणी येथील सेंट्रल बँकेसमोर सोशल डिस्टनसिंगचा उडाला बोजवारा

श्रीरामपुर: लोणी येथील सेंट्रल बँक परिसरात सोशल डिस्टनसिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शासनाने लॉक डाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा वापर करण्यात यावा सांगण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणीच सरकारच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील लोणी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र बँक कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

सध्या बँकांच्या मेन गेटवरूनच सर्वांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे बँकेत जाण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. मात्र असे असताना नागरिक सोशल सिस्टस्टिंग पाळताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी बँकेसमोरील गर्दी कमी करून स्वतः हुन एकमेकांपासून काही अंतरावर उभे राहावे, तसेच बँक प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन ग्राहकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी- दत्तात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा