गोल पोस्ट गुन्हा लोणीकंद तुळापूर गावात एकचा खून, लोणीकंद पोलिसांनी आरोपीला केली अटक

लोणीकंद तुळापूर गावात एकचा खून, लोणीकंद पोलिसांनी आरोपीला केली अटक

तुळापूर,१० नोव्हेंबर २०२०: लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत सोलापूर गावच्या हद्दीत एका परप्रांतीय मजूरात आणि दुसऱ्या परप्रांतीय मुजरात किरकोळ वादात डोक्यात खोरं मारल्याने मृत्यू झाला. यातील आरोपीस लोणीकंद पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले व लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळापूर गावच्या हद्दीत कळमरा येथील सर्वे नंबर १४४ मधील शिंदे यांच्या शेतात षटकोणी मनोऱ्याच्या बांधकाम जवळ रॉबिन शोयलिन सद्दार वय २७ वर्षे रा. पश्चिम बंगाल यांनी किरकोळ भांडणातून तिथे असलेल्या उत्तम राजेंद्रनाथ नासकर वय ४० वर्षे रा. पश्चिम बंगाल यांच्या डोक्यात खोऱ्याने मारून त्याला ठार मारले आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांची माहिती घेतली असता तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नसल्याने आरोपीला पकडणे अवघड होत होते. परंतु तक्रारदार व त्यांचे बांधकाम वरील कॉन्ट्रॅक्टर रिझाऊल अब्दुल मुल्ला यांनी दिलेल्या वर्णनानुसार त्यांच्या लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून शोध घेण्यास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

यावर गुन्हे शोध पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला असता तो वन खात्याच्या जागेत तुळापूर येथे सापडला. त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव रॉबिन शोलियन सद्दार वय २७ वर्षे रा. जयनगर पश्चिम बांगला हे सांगून रात्री उत्तम व त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन त्याच रागात त्यांच्या डोक्यात खोऱ्याने मारले असल्याची सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, दत्ता काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सुरज वाळेकर यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version