गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा टाकळी मध्ये वीज पडून पशु व वित्त हानी

टाकळी मध्ये वीज पडून पशु व वित्त हानी

श्रीगोंदा, १७ मे २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी मध्ये वांळुज वस्ती या ठिकाणी वीज पडून ३ वर्षांची गाय दगावली. सविस्तर वृत्त असे की काल संध्याकाळच्या सुमारास टाकळी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी लावली. या भागातील नागरिकांची आणि शेतकरी वर्गाची पळता भुई उडाली.

टाकळी मधील वांळुज वस्ती या ठिकाणी प्रल्हाद सोपान वांळुज यांच्या घरा शेजारील चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्याचं चिंचेच्या झाडाला बांधलेली गाय असल्याने गाय देखील वीजेच्या तडाख्यात सापडल्यामुळे गाय मरणं पावली. तसेच वीजेच्या प्रभावाने घरातील टिव्ही, पंखा, स्टेपलायजर इ. वस्तूचे नुकसान झाले आहे.

सदर घटनेचा पंचनामा तलाठी भाऊसाहेब रायकर यांनी केला. सरपंच रेखा रंणसिग, पोलिस पाटील किशोरचंद्र वांळुज, उपसरपंच फक्कड शिवाजी वांळुज, हे मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version