गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लव जिहाद हिंदू मुलींच्या असुरक्षिततेचे कारण – अभाविप

लव जिहाद हिंदू मुलींच्या असुरक्षिततेचे कारण – अभाविप

मालेगाव, ०७ नोव्हेंबर २०२०:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगाव कडून अहिंसा चौक येथे हरियाणा येथील निकिता तोमर या हिंदू तरुणीला श्रद्धांजली अर्पण केली गेली.

एका तौसीफ नावाच्या मुस्लिम तरुणाने निकिता तोमर या विद्यार्थिनीला लव जिहादच्या प्रकरणांमध्ये धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला. त्याचसोबत त्या विद्यार्थीनीचे शेवटच्या पेपरच्या दिवशी अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यालाही नकार दिला म्हणून तौसीफ या मुस्लीम तरूणाने दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या केली.
अनेक बळींपैकी आणखीन एक लव जिहाद ची शिकार ठरलेली हिंदू मुलगी आहे. त्यामुळे लव जिहाद वर शासनाने कडक कायदा बनवावा तसेच निकिता यांची केस फास्ट ट्रैक कोर्टात चालवली जावी त्याचसोबत आरोपींना फाशी दिली जावी या मागण्या घेऊन निषेध केला. या श्रद्धांजली कार्यक्रमाला मालेगावातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सामान्य मालेगावकर उपस्थित होते.

यावेळी मालेगावचे शहर मंत्री स्वराज निकम यांनी ‘शासनाने लवकरात लवकर लव जिहाद वर कायदा बनवावा आणि हिंदू मुलींना सुरक्षिततेचे वातावरण तयार करून घ्यावे अशी मागणी शासनाकडे केली.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version