गॅस सिलेंडरवर जे नंबर असतात त्याचा अर्थ काय ?

LPG cylinder expiry date meaning
गॅस सिलेंडरवर जे नंबर असतात त्याचा अर्थ काय ?

LPG cylinder expiry date meaning: गॅस सिलेंडर म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्या स्वयंपाक घरातला सगळ्यात महत्वाचा भाग तो जर नसला तर सगळे काम ठप्प होतात. पण हाच गॅस सिलेंडर तितकाच घातक देखील आहे. एक सिलेंडर कित्तेक जणांचा विनाश करू शकतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही आणि या दुर्घटना होतात त्या मागे कारण आपणच आहे. आता ते कस , प्रत्येक वस्तूची एक एक्सपायरी डेट असते आपल्याला माहिती आहे.आणि अगदी या गॅससी देखील एक डेट असते जी त्यावर ठळक पणे दिलेली असते पण आपण मात्र त्याकडे लक्ष देत नाही.

एलपीजी गॅस सिलेंडरवर असलेले अंक आणि अक्षरे सिलेंडरच्या तपासणीच्या नियोजित तारखेची माहिती देतात. हे सिलेंडरच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक सिलेंडर चा आपला एक कोड असतो आता मग सिलेंडरवरील कोडचा अर्थ नेमका काय होतो हे समजून घेऊया.सिलेंडरच्या कॉलरवर म्हणजे वरच्या बाजूला एक अल्फान्यूमेरिक कोड असतो, जसे की A-25, C-23 इत्यादी.

आता या डबकं चा अर्थ काय होतो तर हे अल्फाबेट महिने दर्शवतात म्हणजेच अक्षर (A, B, C, D): सिलेंडरची तपासणी कोणत्या तिमाहीत होणे आवश्यक आहे हे दर्शवते.

A जानेवारी ते मार्च
B: एप्रिल ते जून
C: जुलै ते सप्टेंबर
D: ऑक्टोबर ते डिसेंबर

आणि सोबतची संख्या उदा. 25 हे सिलेंडरची तपासणी होण्याचा वर्ष (उदा. 2025) दर्शवते. उदाहरणार्थ, C-25 म्हणजे सिलेंडरची पुढील तपासणी जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यान होणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे मुद्दे: एलपीजी सिलेंडरला निश्चित “एक्सपायरी डेट” नसते, परंतु प्रत्येक 5 वर्षांनी “Statutory Testing” आवश्यक असते. जर सिलेंडरवर दिलेली तारीख मागे गेली असेल, उदा. B-22, तर तो सिलेंडर वापरणे सुरक्षित नाही. अशा वेळी, डिलिव्हरी करणाऱ्याला नवीन सिलेंडर बदलून देण्याची विनंती करावी.
जेव्हा कधी आपल्या घरी काही समारंभ असतो जेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला गॅस ची गरज असते त्या वेळी क्रोस चेक नक्की करा.

त्या पद्धतीने एक्सप्रेरी डेट ची माहिती आपल्याला सिलेंडर वरती मिळते तसाच अजून एक मुद्दा आहे सिलेंडरच्या वजनाची माहिती याचा ग्रॉस वजन, टारे वजन याचा देखील सिलेंडरवर दिलेली असते, जी सिलेंडरच्या एकूण वजनाची आणि रिकाम्या सिलेंडरच्या वजनाची माहिती देते.

एलपीजी सिलेंडरवरील टारे वजन आणि ग्रॉस वजन हे दोन्ही महत्त्वाचे असतात: टारे वजन म्हणजे – सिलेंडरचे रिकामे वजन म्हणजेच कंटेनरचे वजन, वॉल्व, पेंट व त्यावरचा कॅप इत्यादींचा एकूण वजन. सिलेंडरवर सहसा TW किंवा “टारे वजन” म्हणून कोड दाखवलेले असते. आता भारतात वापरात असणाऱ्या 14.2 kg गॅस सिलिंडरसाठी, रिकामे सिलेंडरचे वजन साधारणतः 15.3 kg असते.

आता नेट वजन म्हणजे काय तर : हे नेमके गॅसचे वजन आहे — म्हणजे सिलिंडरमध्ये भरलेले वास्तविक गॅसचे वजन. उदाहरणार्थ, भारतीय घरगुती सिलिंडरमध्ये 14.2 kg गॅस असते .

ग्रॉस वजन म्हणजे रिकाम्या सिलेंडर टारे वजन आणि गॅस नेट चे एकूण वजन.
सूत्र: ग्रॉस वजन= टारे वजन  + नेट वजन

भारताच्या 14.2 kg सिलिंडरसाठी:

टारे वजन ≈ 15.3  kg
नेट वजन = 14.2 kg
ग्रॉस वजन ≈ 29.5  kg (सुमारे 29.8–30.2 kg)

उदा. कशी तपासायची:

  1. सिलिंडरवर TW अर्थात टारे वजन स्टँप पाहा (उदा. 15.3 kg).
  2. संपूर्ण संपूर्ण वजन तराजूमध्ये मोजा (उदा. 30 kg).
  3. भरलेला गॅस = संपूर्ण – रिकामे = 30 – 15.3 = 14.7 kg.
    → यामुळे गॅस किती शिल्लक आहे ते कळते .

हे सगळं आम्ही तुम्हाला सांगितलं आहे पण हे महत्वाचं का आहे ते देखील पहा :

महिला मुद्दा आहे सुरक्षितता: ओव्हरफिलिंग टाळण्यासाठी.
योग्य पुरवठा: ग्राहकाला पुरेसे गॅस मिळत आहे का ते सुनिश्चित करण्यासाठी.
शिकायची सोय: घरच्या तराजूसूनच सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे ते पाहता येऊ शकते.

इथून पुढे गॅस घेताना हे लक्षात ठेवा, सिलिंडर विकत घेण्यापूर्वी TW तपासा, आणि जर Gross अपेक्षित 29.8–30.2 kg च्या अगदी जवळपास असेल, म्हणजे तुम्हाला योग्य प्रमाणात गॅस मिळत आहे. कोणतीही विसंगती असल्यास, पुरवठादाराला विचारून घ्या.सिलेंडर वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, ऐश्वर्या शिलवंत