लखनऊ : नवरदेवाला वरमाला घालताच, नवरीचा स्टेजवरच मृत्यू

मालिहाबाद, ४ डिसेंबर २०२२ :खरे तर लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय खास असतो. मात्र, अनेकदा लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे हा आनंद क्षणात दुःखात बदलते, अशीच एक घटना धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मलिहाबाद येथील भदवाना गावातून समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या स्टेजवरच नवरीचा मृत्यू झाला.

भदवाना गावातील रहिवासी फर्निचर कारागीर राजपाल शर्मा यांची मुलगी शिवांगीचे लग्न लखनऊच्या बुद्धेश्वर मोहल्ला येथे राहणारा फर्निचर कारागीर विवेक याच्याशी जुळले होते. शुक्रवारी रात्री ही मिरवणूक भादवणा गावात पोहोचली होती. यानंतर नवरी आणि नवरदेव दोघांनाही स्टेजवर आणण्यात आले. हसत-खेळत वरमाळेचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर खुर्चीवर बसण्यासाठी जात असलेली नवरी अचानक खाली कोसळली. मेडिक कॉलेजमध्ये तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी सकाळी या तरुणीवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर नवरी स्टेजवर ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसू लागली. इतक्यात ती स्टेजवरच कोसळली. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी नवरीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले. मात्र यातच नवरीचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा