गोल पोस्ट राष्ट्रीय लखनऊ हत्याकांड: घरात दिसत होतं भूत म्हणून केला आई व भावाचा खून

लखनऊ हत्याकांड: घरात दिसत होतं भूत म्हणून केला आई व भावाचा खून

लखनऊ, ३० ऑगस्ट २०२०: सध्या उत्तर प्रदेश हे गुन्ह्यांचं केंद्रस्थान ठरत चाललं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दहा ते पंधरा खून झाल्याच्या घटना बिहार मधून समोर आल्या आहेत. त्यातच कालच्या दुहेरी हत्याकांडानं सर्वांनाच चकित केलं होतं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या जवळच हे दुहेरी हत्याकांड घडलं होतं, त्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, आज याबाबत आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या हत्येमध्ये मृत्यू झालेल्या आई व मुलाचा खून त्या मुलीनेच केला असल्याची बातमी समोर आली आहे.
लखनऊतील गौतम पल्ली येथील रेल्वे कॉलनीत दोघांची हत्या करण्यात आली होती. रेल्वेमध्ये उच्च पदावर अधिकारी असलेल्या आर.डी. वाजपेयी यांची पत्नी आणि मुलांची घरातच गोळ्या घालून हत्या केल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मायलेकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणाचा पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला होता.
तपासादरम्यान काही तासांतच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं. या प्रकरणातील खुनी या कुटुंबातील मुलगीच आहे, असं पोलिसांच्या निदर्शनास आलं. विशेष म्हणजे ही मुलगी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहे. या मुलीने खून केला असला तरी ती अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस तपासणी दरम्यान या मुलीनी असे सांगितले की, तिला घरांमध्ये भूत दिसत होतं. कधी खोलीमध्ये तर कधी नेहमीच्या वावरण्याचा जागेत हे भूत तिला दिसत होतं. याबाबत तिने वारंवार घरच्यांना सांगितले परंतु, घरातलं कोणीही तिचं ऐकत नव्हतं. तिला असं वाटत होतं की तिच्या आईला तिच्या या बोलण्यावर विश्वास नाही तर तिचा भाऊ कधीकधी या गोष्टींवर विश्वास देखील ठेवत होता. गेल्या चार वर्षापासून ती नैराश्येत होती.
पोलिसांना तिची डायरी देखील सापडली आहे. डायरीमध्ये देखील तिने याबाबत वारंवार उल्लेख केलेला दिसला. तिच्या बोलण्यावर घरातले कोणीच विश्वास ठेवत नाही म्हणून तिने नैराश्य येऊन आई व भावाचा गोळी घालून खून केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी
error: Content is protected !!
Exit mobile version