औरंगाबाद : औरंगाबाद येथे मोबाईलमधील ‘लुडो’ गेम खेळताना मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कन्नड तालुक्यातील गुदम या गावात ही घटना घडली आहे. पैशांच्या देवाण घेवाणीवरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरे चारायला घेऊन गेलेली मुले ‘लुडो’ खेळत होती. त्यांनी पैसे लावून लुडो गेम खेळण्यास सुरुवात केली.
खेळादरम्यान पैशांमधील देवाण-घेवाणीवरुन बाचाबाची झाली. त्यातुन कौतिक नारायण राठोड ( वय १४) याचा आधी दोरीने गळा आवळून आणि नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.अशी माहिती मिळते आहे.
कन्नड तालुक्यातील गुदमा गावाजवळील जंगलात शुक्रवारी (दि.८) सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर घटना समोर आली. याप्रकरणी कन्नड पोलिसांनी राहुल सुखराम जाधव ( वय २२) याला अटक तर अन्य एका चौदा वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.