गोल पोस्ट गुन्हा मडगाव हादरले, भर दिवसा घरात शिरुन गुंडाचा गळा चिरून खून

मडगाव हादरले, भर दिवसा घरात शिरुन गुंडाचा गळा चिरून खून

मडगाव, गोवा १ सप्टेंबर २०२३ : मडगाव येथील रुमडामळ दवली परिसर येथे एका कुप्रसिद्ध गुंडाचा भर दिवसा गळा चिरून खून झाल्याच्या घटनेने हा संपूर्ण परिसर हादरुन गेलेला आहे. मृतांचे नाव सादिक बेल्लारी उर्फ लाॅली वय वर्षे २३ असे आहे. एका खून प्रकरणात तो जामीनावर सुटला होता. मारेकऱ्यांनी थेट त्यांच्या घरात घुसून त्याला मारुन टाकले आहे.

ही घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास बेल्लारी यांचे आई वडील कामाला गेल्याची संधी साधून मारेकरी घरात शिरले. तो झोपलेला असताना त्यांच्या मानेवर सुऱ्याने सपासप वार करण्यात आले. बेल्लारी हा कारागृहातून नुकताच जामीनावर सुटला होता.

भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे हाउसिंग बोर्ड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. बेल्लारी हा टाईल्स फिटर आहे. त्याला आणि इस्माईल मुल्ला उर्फ छोटू याला चंद्रावाडा येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुरा खुपसून खून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version