गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सिरो सर्वेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून मढेवडगाव या एकमेव गावाची निवड

सिरो सर्वेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून मढेवडगाव या एकमेव गावाची निवड

श्रीगोंदा, २७ ऑगस्ट २०२०: आय.सी.एम.आर. नवी दिल्लीच्या वतीने (कोविड-१९ सर्व्हे सॅम्पल कलेक्शन) सीरो सर्वेसाठी जिल्ह्यातील दहा गावांची निवड झाली आहे. प्रत्येक गावातून ६० लोकांचे रक्त नमुने व जिल्ह्यातील दहा गावांमधून सहाशे लोकांचे रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या सर्व्हेसाठी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या गावातून साठ लोकांचे रक्त नमुने घेण्यात येणार आहेत. ही कार्यवाही जिल्ह्यात एकाचवेळी ३१ ऑगस्टला करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील मढेवडगाव ता. श्रीगोंदा, कोळगाव ता. अकोले, कासार दुमाला ता.संगमनेर, नांदूरखी ता.राहता, मडकी ता. नेवासा, शेवगाव शहर, कौडगाव ता. नगर, वासुंदे ता. पारनेर, संगमनेर शहर,नगर शहर या गावांमधून रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष
error: Content is protected !!
Exit mobile version