मध्य प्रदेश दहावी बोर्डाचे निकाल जाहीर

भोपाळ, दि. ४ जुलै २०२०: आज मध्यप्रदेश च्या दहावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले. यावर्षी लागलेल्या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ६२.८४ इतकी आहे. ही टक्केवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत १ % ने वाढली आहे. मागच्या वर्षी हीच टक्केवारी ६१.३२% एवढी होती. यावर्षी देखील मध्यप्रदेशच्या दहावी निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी दहावी परीक्षा मध्ये ६५.९७% मुली आणि ६०.०९ मुले पास झाली आहेत.

मध्यप्रदेश दहावी बोर्डाने हा निकाल चार सरकारी वेबसाइटच्या माध्यमातून आणि दोन मोबाईल ॲपच्या माध्यमातून जाहीर केला आहे. यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये अकरा लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी सहभागी झाले होते. दहावी परीक्षेचा निकाल याआधी देखील देण्यात आला आहे. कोरोनाव्हायरस च्या संकटामुळे हा निकाल वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेला देण्यात आला आहे. कोरोनाव्हायरस संकटामुळे निकालाशी संबंधित इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी १६ मे रोजी दहावीचे उर्वरित पेपर रद्द करण्याचे आदेश दिले होते. मागील परीक्षांमधील गुणांच्या सहाय्याने दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षा ८ जून पासून ते १६ जून या काळामध्ये घेण्यात आल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा