भेळेचे तुम्ही अनेक प्रकार खाल्ले असतील तथा बाहेर विक्रीसाठी बघितले देखील असतील. परंतु, या लॉक डाऊन मध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध असतील असे नाही. वेळ प्रसंगी आता मुरमुरे मिळणे देखील कठीण. घरात सतत काही ना काही खमखमित खाण्यासाठी हवे असते. यासाठी आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मॅगीची भेळ. तर चला पाहूया कशी बनवतात ही मॅगी ची भेळ…
साहित्य:
मॅगी आवश्यकतेनुसार, कांदा, टोमॅटो, कोथंबीर, मिरची पावडर, मीठ,
कृती:
सर्वप्रथम मॅगीचा बारीक चुरा करून घ्या. नंतर बारीक केलेली ही मॅगी ब्राऊन होई पर्यंत एका भांड्यामध्ये भाजून घ्या. हे लक्षात ठेवा कि मॅगी भाजत असताना किंवा भाजण्यापुर्वी भिजवू नये. मॅगी भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला कांदा, कोथिंबीर मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. मॅगी भेळ एका डिशमध्ये घेऊन त्यावर कोथिंबीर टाकून ते गार्निश करावी व गरम गरम खावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी :