मागणीप्रमाणे वित्तपुरवठा व्हावा- जिल्हाधिकारी द्विवेदी

अहमदनगर : जिल्ह्याच्या विकासदरात वाढ करायची असेल तर जिल्ह्यातील शेतकरी, युवा, महिला आणि उद्योग क्षेत्रासाठी मागणीप्रमाणे कर्जपुरवठा व्हायला हवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँकांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या.
यावेळी द्विवेदी म्हणाले की, मागणीप्रमाणे कर्जपुरवठा करून बँकांनी जिल्ह्यातील शेतकरी, युवा, महिला आणि उद्योग क्षेत्राला पाठबळ द्यावे तसेच बॅंकांनी बांधीलकी जपावी आणि या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.
बँकांनी ठेवी आणि कर्जवितरणातील ताळमेळ ठेवला पाहिजे. शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेच्या वेळी कर्जपुरवठा झाला तर त्यातून बॅंकांची प्रतिमाही सुधारेल. त्यासाठी बॅंकांनी अधिक गतीने काम करावे.
पीककर्जासोबत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज, बचत गटाच्या महिलांना व्यवसायासाठी कर्ज, लघुउद्योजक आणि नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
दरम्यान यावेळी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी शिंदकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक संदीप वालावलकर, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा