लॉकडाऊन मध्ये महा सायबरने दाखल केले ३३३ गुन्हे

पुणे, ३० एप्रिल २०२०: देशात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून समाज माध्यमांवर लोकांचा भर वाढला आहे. तसेच मधल्या काळात अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे अफवांना उधाण आले होते. समाजातील काही गुन्हेगार व समाज कंटकांकडून या काळात गैरफायदा घेण्यात आला. समाज माध्यमांमध्ये खोट्या बातम्या व अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा व खोटी माहिती पसरवणाऱ्या वर महा सायबर ने तब्बल ३३३ गुन्हे दाखल केले आहेत.

या कारवाईत आत्ता पर्यंत १५२ लोकांना अटक करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण व पुणे ग्रामीण मध्ये या बाबत नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि टिक टॉक यांसारख्या सामाजिक माध्यमांच्या बाबतीत हे गुन्हे आहेत. व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १३८ गुन्हे, फेसबूक पोस्ट्स शेअर १२५, टिक टॉक विडिओ शेअर १० व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट ६, इंस्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट ४, तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच ६० आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश आले आहे.

गुन्ह्यांमध्ये बीड २९, पुणे २७, जळगाव २६, मुंबई २०, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक १२, नाशिक शहर ११, जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०, लातूर १०, नांदेड ९, पालघर ९, ठाणे शहर ८, परभणी ८, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, अमरावती ७, ठाणे ७, हिंगोली ६, नागपूर शहर ६ या प्रमुख जिल्ह्यांचा आणि शहरांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा