युएस: अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण असलेल्या महाभियोग चौकशी समितीसमोर युक्रेनमधील माजी राजदूत मारी योवानोविच यांनी दिलेल्या सक्षिवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, सध्या आपल्या विरोधात सुरू असलेली महाभियोग चौकशी म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील दुटप्पीपणाचा कळस आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले की, इतका दुटप्पीपणा देशाच्या इतिहासात कधी पाहिला नव्हता. ट्रम्प यांनी मारी योवानोविच यांच्या साक्षीपूर्वी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्हालोदमीर झेलेन्स्की यांना केलेल्या एप्रिलमधील दूरध्वनीचा लेखी तपशील सादर केला आहे. त्या तपशीलाचा दाखला देत त्यांनी काही चूक केली नसल्याचा दावा केला.