महादेव जानकर यांचा भाजपाला चिमटा काढत पंकजा मुंडे यांना सल्ला, रासपत येण्याची ही ऑफर

नांदेड, २ जुलै २०२३ : भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी वेळोवेळी आपली खदखद व्यक्त केली आहे.आता रासपचे नेते महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना सासुरवास सहन करण्याचा सल्ला देताना भाजपमध्येच रहावे असे म्हटले आहे. तसेच त्या प्रगल्भ असून भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. ज्या पक्षात आहेत त्यांनी तिथेच सुखी राहावे, प्रसंगी सासुरवास सहन करावा. तर जेव्हा सासुरवास सहनच होत नाही असे वाटले तर या भावाचा पक्ष आहेच. त्यांच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे खुलीच आहेत असेही जानकर यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांनी आपल्या मनातील खदखद ही बोलून दाखवली आहे. तर आता मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही असा निर्धार केला आहे. त्यावरून आता त्या नाराज असल्याच्या तसेच भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ज्या ज्या वेळी त्यांच्या नाराजीचा सूर दिसून आला त्यानंतर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीएसआर पक्षाची मोठी ऑफरही आहे.

त्यामुळे पंकजा आता त्यांना योग्य वाटेल त्या पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांचे मानसबंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय खळबळ उडाली असून पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? मानसबंधू जानकर यांचा हा सल्ला मानणार का? हे पहावे लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा