गोल पोस्ट शैक्षणीक राज्यस्तरीय महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने महादेव पवार यांना सन्मानित

राज्यस्तरीय महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्काराने महादेव पवार यांना सन्मानित

माढा, ३ डिसेंबर २०२०: येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचे सहशिक्षक एम.आय. पवार यांना पुणे येथील अखिल भारतीय साहित्य परिषदेचा ‘महात्मा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, चित्रपट कलाकार राहुल बळवंत, संमेलनाध्यक्ष सुरेखा पवार व अभिनेत्री विनिता या मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला.

यापूर्वी विद्यार्थीप्रिय शिक्षक पवार यांना साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, माढा तालुक्यातील खैराव येथील १५ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात शैक्षणिक व सामाजिक पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. एम.आय. पवार यांची २२ वर्ष सेवा झाली असून त्यांचे विद्यार्थी शिक्षणाबरोबर वक्तृत्व स्पर्धा, धनुर्विद्या, शिकई मार्शल आर्ट, कराटे स्पर्धा यामधून चमकले आहेत. या पुरस्कारामुळं पवार यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version