नवी दिल्ली : चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सन्मानाबद्दल अमिताभ बच्चन यांनी भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. हा सन्मान मिळाल्यानंतर बच्चन यांनी भारत सरकार, निर्णायक मंडळाच्या सदस्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अमिताभ म्हणाले की, जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. हा पुसरस्कार सेवानिवृत्तीचे चिन्ह तर नाही? ते पुढे म्हणाले कि नका अजून बरेच काम कराचे आहे. २३ डिसेंबरला अमिताभ यांना हा सन्मान देण्यात येणार होता, पण ते आजारी असल्यामुळे पुरस्कार घेण्यासाठी पोहोचू शकले नाहीत.
याच कारणास्तव त्यांना २९ डिसेंबर रोजी पुरस्कार देण्यात आला.
दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकार तर्फे दिला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीत योगदानाबाबद्दल पुरस्कार देण्यात येतो. प्रथम १९६९ मध्ये अभिनेत्री देविका राणी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
: चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.