बॉलिवूडचे शेहेनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्थात आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे.
संघर्षातून बनला महानायक : अमिताभ यांचा पहिला चित्रपट ‘7 हिंदुस्थानी’ हा आजपासून बरोबर 50 वर्षांपूर्वी अर्थात 7 नोव्हेंबर 1969 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अमिताभ यांच्य करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. मात्र आपले मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कधीच संकटांपुढे हार मानली नाही.
अभिषेक ने दिल्या शुभेच्छा : अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने वडिलांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला…
एक मुलगा म्हणूनच नाही, तर अभिनेता आणि चाहता म्हणूनही तुमच्याकडे पाहताना अभिमान वाटतो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
पुढील अनेक पिढ्या आम्ही बच्चन यांच्या काळात वाढलो, असं अभिमानाने सांगतील.
गाजलेले चित्रपट : जंजीर, दिवार, अमर अकबर अँथनी, शोले, कुली, डॉन, शहनशाह, मर्द, शराबी, लवारीस, मुकद्दर का सिकंदर, बागबान, कभी ख़ुशी कभी गम, मोहब्बते, पा इत्यादी.
दरम्यान, अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत, तसेच त्यांचा आगामी चित्रपट ‘झुंड’ हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.