गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महापौर पदासाठी सोमवारी अर्ज भरण्याची मुदत

महापौर पदासाठी सोमवारी अर्ज भरण्याची मुदत

पुणे: सध्या सर्वत्र महापौर पदासाठी चुरशी्चे वातावरण तयार झाले आहे. महापौर पदासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पुण्यात महापौर पदासाठी अर्ज करण्यासाठी सोमवार तारीख १८ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पुण्याच्या नव्या महापौरांची निवड येत्या शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा कार्यकाळ येत्या २१ नोव्हेंबरला संपणार आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी अकराला ही निवडणूक होईल. महाराष्ट्र जल सर्वेक्षण विकास विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती महानगरपालिकेचे नगर सचिव सुनील पारखी यांनी दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version