महाराष्ट्र CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, १६ एप्रिल ते २ मे दरम्यान परीक्षा होणार

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३ : महाराष्ट्रातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. अशा परिस्थितीत आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘MHT- CET परीक्षा १६ एप्रिल ते २ मे या कालावधीत होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलद्वारे सीईटी घेतली जाते. आता वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनीही परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

यंदा ‘सीईटी सेल’कडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील जवळपास २० व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. या प्रवेश परीक्षेसह संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने MAH MBA CET, MMS CET, MAH MCA CET, MHT CET, MAH LLB ५ वर्ष CET, MAH B.Ed CET, MAH BHMCT CET, MAH BPlanning CET, MAH MPEd च्या तारखा जाहीर केल्या आहेत. एमएच कॉमन एंट्रन्स टेस्टच्या घोषणेनुसार, या परीक्षा मार्च २०२४ ते मे २०२४ या कालावधी घेतल्या जातील. cetcel.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी संपूर्ण CET संभाव्य वेळापत्रक पाहू शकतात आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा