मराठी माणसाच्या अवस्थेला मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप जबाबदार, संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई, २ ऑक्टोंबर २०२३ : महाराष्ट्रात दररोज मराठी माणसांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. गेल्या आठवड्यात मुलुंडमधील शिवसदन सोसायटीत एका मराठी महिलेला जागा न दिल्याची घटना समोर आली. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकारणी या मुद्दयावरून एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबईच्या मुलुंडमधील एका सोसायटीत मराठी महिलेला जागा नाकारण्यात आल्याची घटना गत आठवड्यात घडली. या घटनेनंतर आता राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी सोमवारी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या या स्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपला जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे.

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या दुरवस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार आहेत. यामुळेच शिवसेना कमकुवत झाली. पण, मुंबईतील मराठी माणसाचा आवाज आणि सत्ता संपवण्यासाठीच भाजपने शिवसेना फोडली. शिवसेना तोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जाईल. मुंबईमधील मराठी माणसाचा आवाज, ताकद संपवण्यासाठीच भारतीय जनता पक्षानं शिवसेना तोडली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक बेईमान आहेत, हे सर्व जबाबदार आहेत. यातून आम्ही धडा घेतला आहे , येत्या दिवसात पाहाच काय होतं असं बोलत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपा वर निशाण साधला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा