लेह, ४ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारक आणि संग्रहालयाच्या नूतनीकरणाची पायाभरणी केली. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपले सरकार लष्कराला सहकार्य करेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, कारू येथील युद्ध स्मारक आणि संग्रहालय हे राष्ट्राच्या सन्मानाचे, अखंडतेचे प्रतिक असून त्रिशूल विभागातील सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आणि महान योगदानाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, हे संग्रहालय त्रिशूल युद्ध स्मारकाजवळ बांधले जात आहे आणि तीन प्रदर्शन हॉलसह त्रिशूलच्या आकारात असेल. या कक्षांमध्ये लष्कराने आतापर्यंत केलेल्या सर्व ऑपरेशन्सची माहिती दिली जाईल.
प्रवक्त्याने सांगितले की, कारू येथील संग्रहालयाच्या प्रस्तावित जागेवर पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये श्रीकांत भारतीय, जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि त्रिशूल विभाग, महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळ समितीचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, लडाखच्या वीरांना हीच खरी श्रद्धांजली आहे ज्यांनी देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड