शिक्षण विभाग आता डिजिटल युगात आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे! नागरिकांना शासकीय योजना, सेवांचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. राज्य सरकारने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी तब्बल ₹९.५ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
हा उपक्रम ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणार असून, या चॅटबॉटमुळे नागरिकांना योजनांबाबतची सर्व माहिती सोपी, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे.
सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे शिक्षण विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले
