गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे गणेशोत्सवात पुणे पोलिसांची धडक मोहीम! अतिक्रमण व फेरीवाले हटविण्यासाठी 11 विशेष पथके...

गणेशोत्सवात पुणे पोलिसांची धडक मोहीम! अतिक्रमण व फेरीवाले हटविण्यासाठी 11 विशेष पथके सक्रीय

आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांनी अतिक्रमणविरोधी आणि फेरीवालाविरोधी कारवाईला गती दिली आहे. रस्ते मोकळे ठेवून संभाव्य चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे म्हणाले,

“दुसऱ्या टप्प्यात आमची अतिक्रमणविरोधी आणि फेरीवालाविरोधी पथके, पुणे महानगरपालिकेच्या पथकांसोबत मिळून कारवाई करत आहेत. रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व फेरीवाले हटविले जात आहेत. ही कारवाई गणपती उत्सव संपेपर्यंत सुरू राहील.”

रावळे यांनी सांगितले की, शहरात 11 विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे रस्त्यांना ‘मोकळा श्वास’ मिळणार असून, नागरिकांचा गणेशोत्सवाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे 

error: Content is protected !!
Exit mobile version