‘पुष्पां’ना रोखण्यासाठी वनविभागाला आता ‘थार’ आणि ‘स्कॉर्पिओ’!

वनसंरक्षण आणि वन्यजीव संरक्षणाला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुनाट वाहनांमुळे वनविभागाच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ५६३ नवीन अत्याधुनिक वाहने खरेदी केली जाणार आहेत.

‘थार’, ‘स्कॉर्पिओ’, ‘बोलेरो’ आणि ‘सुमो’ यांसारख्या गाड्यांमुळे जंगल गस्त, तस्करी आणि शिकारविरोधी कारवाया अधिक प्रभावीपणे करता येतील.

गेल्या १० वर्षांपासून नवीन वाहने न मिळाल्यामुळे वन अधिकाऱ्यांचे काम मंदावले होते, मात्र केंद्राच्या नवीन नियमांनुसार ‘कॅम्पा’ निधीतून ही वाहने घेतली जाणार आहेत. या नव्या गाड्यांमुळे जंगलातील तस्करांना रोखणे आणि वनसंपदेचे संरक्षण करणे अधिक सोपे होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे