महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे – देवेंद्र फडणवीस

मुंबई, ११ सप्टेंबर २०२०: कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातला वाद हा चांगलाच रंगलेला आहे. अश्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले ,”कंगना सोबत जितकी क्षमता लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील ५० टक्के क्षमता जरी सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील. सरकारला असं वाटतंय की कोरोनासोबतची लढाई संपली आहे आणि आता कंगना सोबत लढायचं आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

सरकारने दाऊदच्या घरावर कारवाई केली नाही पण अभिनेत्रीच्या घरावर केली, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवरून सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, कंगनाचा मुद्दा भाजपने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं?, असं फडणवीस म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा