महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता

बेळगाव, १२ जानेवारी २०२३ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा समावेश असल्यामुळे सुनावणी अनिश्चित झाली आहे. जोपर्यंत नवे खंडपीठ स्थापन होत नाही, तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुधवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायाल्यात सुनावणी होणार होती; पण त्रिसदस्यीय खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागारत्ना यांचा समावेश होता. त्यामुळे आज सुनावणी झाली नाही. नवे खंडपीठ स्थापन होत नाही तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या दाव्यात महाराष्ट्र किंवा कर्नाटकाच्या न्यायमूर्ती यांचा खंडपीठात समावेश झाला तर नैतिकतेच्या मुद्द्यावर सुनावणी होत नाही. याच मुद्द्यावरून सीमाप्रश्न सुनावणी अनेकदा लांबणीवर पडली आहे. याआधी ३० ऑगस्ट २०२२ रोजी सीमाप्रश्नाची सुनावणी झाली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या वकिलांना तयारीसाठी वेळ मिळाला नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा