महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला काका पवारांच्या पट्ट्यांनी

पुणे : महाराष्ट्रात सर्वात मानाची मानली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चालू झाला आहे.

या स्पर्धेचा आज पहिला दिवस होता. हा पहिला दिवस गाजवला आहे काका पवारांच्या पहिलवान ने. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पहिलवान नी. आबासाहेब अटकळे, संतोष रुगडे आणि धर्मा शिंदे अशी या पहिलवान ची नवे आहेत. या तिन्ही पहीलवणांनी वेगवेगळी पदके पटकावली आहे. आबासाहेब सुवर्ण पदक, संतोष ला रौप्य पदक आणि धर्मा शिंदे याला ब्राँझ पदक मिळाले आहे.

या वेळी बोलताना आबासाहेब म्हणाला की, या विजयाचे श्रेय त्याचे गुरु काका पवार आणि आई वडिलांना देत आहे. तो पुढे म्हणाला की, ‘अमाच्या घरात आधीपासूनच कुस्ती चालत आलेली आहे. माझे वडील पण चांगले पहिलवान होते आणि माझा भाऊ देखील पहिलवान होता आणि आता हा वासारा मी पुढे नेत आहे.’ आबासाहेब हा सोलापूर मधील पंढरपूर तालुक्यातील शेगाव धुमाल गावाचा आहे. काका पवारांकडे तो गेली १० वर्षे आहे. संतोष रुगदे हा कोल्हापूरचा आहे तर धर्मा शिंदे हा नाशिक चासा आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा