महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १५ पदांसाठी भरती

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदार्थांमध्ये गट-अ आणि गट-ब यांच्या अंतर्गत दोनशे जागांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पाच एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ३७ निरनिराळ्या केंद्रांवर घेतली जाईल. असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले. यामध्ये सर्वाधिक नायब तहसीलदाराच्या ७३ जागांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक राज्यकर आयुक्त १० जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी ७, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी १, उद्योग उपसंचालक, तांत्रिक १, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता २ अशा वर्ग एकमधील २१ जागांची भरती केली जाणार आहेत. वर्ग ब मधील उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गट विकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उप अधीक्षक भूमी अभिलेख ६, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ३, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग १, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ४, सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी तत्सम ११ आणि नायब तहसीलदार ७३  अशा जागांची पदांची भरती केली जाईल.

पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दोन. तीन. व चार ऑगस्ट २०२० रोजी होण्याची शक्‍यता आहे. पूर्व परीक्षेसाठी अमागास वर्गासाठी ५२४ रुपये तर मागासवर्गीय व अथान उमेदवारांसाठी ३२४ रुपये शुल्क आहे. ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा