तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे’ हा खास उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे तुम्ही काढलेले उत्तम फोटो या स्पर्धेत पाठवू शकता.
तुमच्या छायाचित्राची गुणवत्ता, सर्जनशीलता आणि पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य या निकषांवर विजेत्यांची निवड होईल प्रथम विजेत्यास तब्बल ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. याशिवाय, उपविजेत्यांना १ लाख आणि ७५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील, तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसेही आहेत. ‘फोटो ऑफ द मंथ’ विजेत्यांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये मोफत राहण्याची संधी मिळणार आहे. चला, आपला कॅमेरा उचला आणि महाराष्ट्राचे सौंदर्य जगाला दाखवा!
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे