गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे खुशखबर! नवरात्रीत सुकामेवा स्वस्त, उपवास आणि सण होणार गोड!

खुशखबर! नवरात्रीत सुकामेवा स्वस्त, उपवास आणि सण होणार गोड!

नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुकामेव्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता आणि अंजीर यांसारखे ड्रायफ्रूट्स प्रति किलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.या निर्णयामुळे उपवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

आता खजूर ३५० वरून ३१५ रुपये प्रति किलो, तर अंजीर १५०० वरून १३०० रुपये प्रति किलो झाले आहे. या किमती घटल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात सुकामेवा आला आहे. हा बदल दसरा-दिवाळीसारख्या आगामी सणांसाठीही एक गोड भेट ठरणार आहे. कमी झालेल्या दरांचा फायदा घेऊन नागरिक आता अधिक प्रमाणात सुकामेव्याची खरेदी करू शकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version