गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चा आजपासून श्रीगणेशा!

पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चा आजपासून श्रीगणेशा!

पुणेकरांच्या लाडक्या पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचा आज, सोमवार (२२ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता दणक्यात शुभारंभ झाला. लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ येथे पुढील १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

यामध्ये होम मिनिस्टर, गीतों का सफर आणि जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, सोलो डान्स कॉम्पिटिशन आणि स्वरसम्राज्ञी लतादीदींना स्वरांजली अर्पण करणारा विशेष कार्यक्रमही होणार आहे. दसरा आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनुक्रमे रावण दहन आणि दुग्धपान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलची सांगता ग्रुप डान्स कॉम्पिटिशनने होईल. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version