महाराष्ट्र पोलिसांत मेगा भरती १८,६३१ जागांसाठी भरती जाहीर, तरुणाईत उत्साह

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य सरकारने पोलीस भरतीचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रभरात पोलीस शिपाईच्या तब्बल १८,६३१ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे! ✍️

यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ३५६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.


💡 विशेष सवलत: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा!

२०२२ आणि २०२३ मध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली होती, त्या हजारो उमेदवारांना अर्जाची दुसरी संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेकांचे पोलीस होण्याचे स्वप्न पुन्हा उजळणार आहे.


📌 जिल्हास्तरावर भरती, स्थानिकांना प्राधान्य

ही भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर होणार असल्यामुळे, स्थानिक तरुणांना अधिक संधी मिळणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज भरण्याच्या तारखा आणि शारीरिक चाचणीसंबंधी माहिती लवकरच पोलीस भरती बोर्डाकडून जाहीर केली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे