महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात तब्बल ३६ जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. ‘महाराष्ट्र पोलीस’ आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ५९ वा वर्धापन दिन आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती १६६१ साली झाल्याचे आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर १६७२ साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला.

१९३६ मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे १९४७ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम,१९५६ नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर २जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. सध्याचे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून दोन वर्षांपासून हा ‘स्थापना दिन’ साजरा होत आहे. यामुळेच आज राज्यात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा