उमेदवारांची मुल्यमापन चाचणी करणे व समुपदेशन करुन रोजगार / स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सहाय्य करण्यासाठी सर्व प्रवर्गासाठी ही योजना राबविण्यात येते.
योजनेच्या प्रमुख अटी :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये वेब पोर्टल येथे नाव नोंदणी केलेले 14 ते 40 वयोगटातील बेरोजगार उमेदवार.
शैक्षणिक पात्रता 10 वी / 12 वी, आयटीआय, पदवीधारक, पदवीधारक किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित, शिक्षण सोडलेले, कुशल किंवा अकुशल उमेदवार.
नोकरीचा अनुभव असलेले किंवा नसलेले बेरोजगार उमेदवार.
आवश्यक कागदपत्रे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संकेतस्थळावर (www.maharojgar.gov.in) नोंदणी.
लाभाचे स्वरूप असे :
▪ उमेदवार व उद्योजकांची नोंदणी करणे / नोंदणी वाढवणे.
▪ उमेदवारांची मुल्यमापन चाचणी, वर्तणुक चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी, कौशल्यचाचणी, कल चाचणी घेणे.
▪ वरील चाचणीवर आधारीत आवश्यक त्या प्रशिक्षणाबाबत उमेदवारांना मार्गदर्शन / शिफारशी करणे.
▪उमेदवारांना रोजगाराकरीता मार्गदर्शन व समुपदेशन करुन मुलाखतीची संधी उपलब्ध करुन देऊन रोजगार उपलब्ध करुन देणे.
▪ उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करुन त्याकरीता प्रोत्साहीत करणे व स्वयंरोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने मदत करणे.
या ठिकाणी संपर्क साधावा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय पत्ता : 3 रा मजला (विस्तारित), कोकण भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई 400614.
संकेतस्थळ : www.maharojgar.gov.in
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.