जलसंधारणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२३: जलसंधारणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध झाला. बहुतांश जलाशयांची मोजणी झाल्यामुळं यासंबंधीच्या अहवालात महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी हा अभिमानाचा क्षण असल्याचं वर्णन केलं असून भविष्यात राज्यात पाण्याचं संकट उद्भवू नये यासाठी राज्याचे महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं लिहिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार, जलसंधारणाच्या योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात जलसंधारणाशी संबंधित सर्वाधिक योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत. भविष्यात महाराष्ट्रात पाण्याचं संकट येणार नाही, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून त्यानुसार विविध योजनांना आकार देत आहे.

ही गणना २०१८-१९ मध्ये करण्यात आली आणि त्याचा अहवाल आता आलाय. बहुतांश पाणवठे जलसंधारण योजनेंतर्गत आणण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सन्मान सामुहिक यश असल्याचं सांगून हे कार्य यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार २.० मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा