मुंबई, १८ मे २०२३: राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणाचं टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले आहे. मुंबई येथे राज्य सरकारच्या युवा कौशल्य विभागाच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज’ युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आज उद्धाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार तरुणांना नोकऱ्या सरकारने दिल्या. आणखी तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट सरकारचं आहे. आमचे सरकार विधार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी हजारो करोड रुपये खर्च करते. तरुणांना स्वयंरोजगार मिळावा हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना १५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विना व्याज दिल जातं. त्याला कोणतही तारण घेतलं जात नाही. देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी युवाशक्तीचा योग्य वापर व्हायला पाहिजे. त्यांना दिशा दाखविण्याचं काम आपण केलं आहे. यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपला देश महान बनवू, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर