कृष्णदेव चिंतामणी भोई यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

माढा, दि. ६ सप्टेंबर २०२०: माढा तालुक्यातील परिते केंद्रातील बेंबळे येथील काळे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्तीचे शिक्षक कृष्णदेव चिंतामणी भोई यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

बेंबळे येथील काळेवस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्यापनाचे काम शिक्षक कृष्णदेव चिंतामणी भोई हे करत असून त्यांच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२० त्यांना जाहिर झाला आहे.

भोई यांनी आपल्या ११ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत पारधी ,धनगर, भोई या समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शैक्षणिक, सामाजिक कार्य तसेच कोविड १९ या आपत्तीजनक परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भोई सरांच्या मार्गदर्शनामुळे नागरिक व विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने सन २०२० सालचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार कृष्णदेव भोई यानां जाहीर करण्यात आला.

तसेच वेळोवेळी लोक वर्गणी करून त्यात स्व:ताची रक्कम घालून माढा तालुक्यातील भिमानगर, मस्केवस्ती, काळेवस्ती येथे e-learning, वृक्ष संवर्धन इमारत व दुरुस्ती, रंग रंगोटी, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दिले आहे. तंबाकू मुक्त शाळेसाठी योगदान, ग्रामस्वच्छता अभियान, विध्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिध: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा