बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापन दिनाचा पहिला दिवस उत्साहात साजरा…

Bal Gandharva Rangmandir 57th Anniversary Celebration in Pune
बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापन दिन;

Bal Gandharva Rangmandir 57th Anniversary Celebration in Pune: केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर च्या वर्ध्यापानदिना निमित्त ‘ बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.या प्रसंगी आपलो मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी म्हणाल्या, “वयाच्या नवव्या वर्षा पासून मी कलाक्षेत्रात कार्यरत असून आज तागायत मी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी प्रकार करायला तयार असतात. हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला यामुळेच मिळाली. आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

त्यांनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली 17 वर्ष बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुण्याची सांस्कृतीक ओळख जपण्याचे काम केले जात आहे. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ‘ब्लॅक अँड व्हाइट’च्या काळा पासून पाहत आलो आहोत. त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखणण्याजोगी आहे. लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी दिला.

"अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत"- प्रशांत दामले

प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत. यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर, गडकरी रंगयातन आणि वाशीच विष्णुदास भावे नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत. एव्हडे केले तरी शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील. तसेच नाट्यगृहाशी संबंधीत लोकांना सोबत घेवून नाट्यगृहांचे नियोजन केल्यास ते अचूक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षासाठी शासनाने एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे तरी राज्यातील नाट्यगृह निट होतील असा आशावाद देखील दामले यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी मा.आमदार उल्हासदादा पवार, डॉ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे,,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर