गोल पोस्ट राजकारण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले: संजय राऊत

महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले: संजय राऊत

मुंबई: संजय राऊत यांनी आज सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेतली सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “या सगळ्या घडामोडींशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. मी ठामपणे सांगतो की ज्याप्रकारे अजित पवार यांनी अचानक विधानसभेच्या राजीनामा दिला तेव्हाच मला संशय आला यांच्या मनात काहीतरी काळंबेरं चालू आहे”.
त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले की, “रात्रीच्या अंधारामध्ये पाप होत चोरून पाप केलं जातो. तुम्ही आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन या महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ”
या सर्वांवर आपला राग व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे व त्यांच्या या नृत्यासाठी त्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version